महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। परवानाधारक वाहनचालकांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील वाहनचालकांना आता थेट जर्मनीत नोकरी मिळणार आहे. जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यात कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. त्यानुसार तब्बल 10000 कुशल वाहनचालक जर्मनीला पाठण्यात येणार आहे.
विशेष बाब म्हणजे यातील पहिले1000 वाहनचालक तातडीने पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे.या कामाची सर्व जबाबदारी राज्याच्या परिवहन विभागावर सोपविण्यात आली आहे. पुण्यातील ‘आयडीटीआर’ या संस्थेत वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यात येईल त्यासाठी चालकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.
जर्मनीत ड्रायव्हर जॉबसाठी अटी
वाहनचालकांकडे जड वाहने चालविण्याचा परवाना आवश्यक
तसेच त्याला जर्मन भाषा लिहिता व बोलता यायला हवी. यासाठी सरकार प्रशिक्षण देईल.
वाहनचालकाची शारीरिक तसेच मानसिक स्थिती उत्तम असावी
दीड महिन्याच्या प्रशिक्षणानंतर वाहनचालकांची चाचणी घेण्यात येईल. त्यात उत्तीर्ण झालेल्यांना थेट जर्मनीत पाठवले जाईल.