Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाचं अपडेट समोर आलंय. सरकारनं आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याच्या तारखेच्या मुदतेत वाढ केल्याचं समोर आलंय. आता या योजनेसाठी महिलांना सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करण्याकरिता आता मुदतवाढ देण्यात आलीय. त्यामुळे आता महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रूपये लाभ मिळणार आहे.

ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या किंवा ज्या महिलांना अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व गरजू महिलांना मिळावा, हाच यामागे सरकारचा हेतू आहे. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही त्यांना खोडा दाखवा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *