पुणेकर घराबाहेर पडण्याआधी हि बातमी पहा ; या कार्यक्रमासाठी वाहतुकीत बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे उद्‍घाटन शनिवारी (ता. १६) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-बंगळुरू महामार्गावर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) शनिवारी (ता. १७) सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल. तसेच बालेवाडी, बाणेर परिसरातील वाहतुकीत पोलिसांनी बदल केला आहे.

बाणेर रस्त्यावरील वाहतुकीत बदल
चौकाकडून बाणेर रस्त्याने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे

मुंबई-बंगळूर महामार्गावरून बाणेर रोडवर जाणाऱ्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे हायस्ट्रीटमार्गे गणराज चौकातून जावे

पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळामार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रस्ता मार्गे न जाता पाषाण रस्त्यावरून चांदणी चौक मार्गे किंवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोडमार्गे जावे

पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक-पाषाण रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक-बाणेर रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल-औंध रोडवर शनिवारी पूर्ण दिवसभर अवजड वाहनांना प्रवेश बंदी.

बालेवाडीतील वाहतुकीत बदल
बालेवाडी क्रीडा संकुल जवळील राधा चौक ते मुळा नदी पुलापर्यंत सेवा रस्त्यावर प्रवेशबंदी, कार्यक्रमाला येणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने या मार्गाने जाऊ शकतील; बालेवाडी बंटार भवन परिसरात वाहनासाठी पार्किंग व्यवस्था असेल, या ठिकाणच्या मार्गावर जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे.

अवजड वाहन बंदीचे नियोजन
मुंबई-बंगळूर महामार्गावरून चांदणी चौक ते उर्से टोल नाका येण्या-जाण्यास बंदी; चाकणकडून पिंपरी-चिंचवडमार्गे बंगळूर महामार्गाकडे येण्यास बंदी; पुण्याहून मुंबईकडे मुंबई-बंगळूर महामार्गाने जाण्यास बंदी; तळेगाव, देहूरोडमार्गे मुंबई-बंगळूर महामार्गावर येण्यास बंदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *