महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑगस्ट ।। जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्स (Mpox) ही जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.WHO ने याबाबत आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी आफ्रिकेत त्याचा प्रसार झाला होता आणि आता युरोपातील काही देशांमध्येही याची लागण होऊ लागली आहे.
चिकनपॉक्स आणि स्मॉलपॉक्स कुटुंबातील Mpox देखील आहे, जो एका माणसाकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो. सध्या तो कोविडसारखा हवेत पसरत नाही ही दिलासादायक बाब आहे. असे असूनही घाबरू न जाता सर्वांनी सतर्क राहाणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे, बहुतेक प्रकरणांमध्ये तो स्वतःच बरा होतो असे WHO ने सांगितले आहे आणि आजपर्यंत भारतात या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही हि भारतीयांसाठी चांगली बाब आहे.
