महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑगस्ट ।। सोमवारी संपूर्ण देशात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. भाई-बहिणीचे प्रमे अधोरेखित करणाऱ्या या सणाची बहीण-भाऊ मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. भाऊ परगावी असेल तर अनेक बहिणी पोस्टाद्वारे आपल्या भावाला राखी पाठवतात. या सणाचे महत्त्व लक्षात घेता या दिवशी बँकांना सुट्टी असेल का? असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खरंच बँकांना सुट्टी असेल का? हे जाणून घेऊ या..
तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करायचे असेल, तर सोमवारी बँक चालू राहील का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. दरम्यान, रक्षाबंधनच्या या दिवशी अनेक राज्यांत बँकांना सुट्टी असेल. तर काही ठिकाणी बँका चालू राहतील.
19 ऑगस्ट रोजी कोणकोणत्या राज्यांत बँका बंद असणार?
सोमवारी रक्षाबंधन हा सण आहे. यासह सोमवारी पौर्णिमादेखील आहे. याच दिवशी बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांचा जन्मदिवसही आहे. याच कारणामुळे अगरतळा, अहमदाबाद, भूवनेश्वर, देहरादून, जयपूर, कानपूर, लखनौ आणि शिमला या ठिकाणी बँका बंद असतील. तर देशात उर्वरित ठिकाणी बँका चालू राहतील.
महाराष्ट्रात बँका चालू राहणार का?
रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बँका चालू राहणार आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी नसेल. त्यामुळे तुमचे बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही ते करू शकता.
ऑगस्ट महिन्यात बँकांना आणखी किती दिवस सुट्टी
ऑगस्ट महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत. 20 ऑगस्ट 2024 रोजी श्री नारायण गुरु जयंती आहे. त्यामुळे कोची आणि तिरुअनंतपूरम या ठिकाणी बँका बंद असतील. 24 ऑगस्ट रोजी चौथा शनिवार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात बँका बंद असतील. 25 ऑगस्ट रोजी रविवार आहे. तेव्हादेखील बँका बंद असतील. 26 ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव असेल. त्यामुळे अहमदाबाद, भूवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, शिमला, पटना, रायपूर, रांची आणि शिलाँग या ठिकाणी बँका बंद असतील. त्यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम करायचे असेल तर या सुट्ट्या लक्षात घेऊनच नियोजन आखायला हवे.
दरम्यान, सुट्टीच्या दिवशी बँका बंद असल्या तरी या काळात ऑनलाईन बँकिंगची सुविधा चालूच असेल. त्यामुळे तुम्ही या सुट्टीच्या दिवशी तुम्ही ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार करू शकता.