महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। आजकाल अनेक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातील खर्चासाठी क्रेडिट कार्ड्स वापरतात. क्रेडिट कार्ड वापरल्याने आपल्याला विविध प्रोडक्ट्सवर सूट मिळते. तुम्ही याचा वापर करून भरपूर ऑफर्सवर पैशांची मोठी सुट मिळवू शकता. यामध्ये रिवॉर्ड सुद्धा मिळतात. मात्र असे कार्ड वापरण्याआधी आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
काही व्यक्तींना क्रेडिट कार्ड नेमके कसे वापरले जाते याबद्दल काहीच माहिती नसते. तुम्हाला सुद्धा या गोष्टींची माहिती नसेल तर वेळीच ही माहिती वाचा. कारण चुकीच्या पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याने मोठं आर्थिक नुकसान होतं.
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड खरेदी करताना ते चार्ज कार्ड आहे का ते तपासा. तसेच यावर याचा वार्षिक चार्ज काय आहे याची माहिती जाणून घ्या. शॉपिंगशी संबंधीत कार्डवर आपल्याला चार्जची सूट दिली जाते. परंतू यासाठी देखील काही ठरावीक रकमेची मर्यादा असते.
ड्यू डेट
प्रत्येक क्रेडिट कार्डची एक ठरावीक ड्यू डेट असते. ड्यू डेट ओलांडून गेल्यावर त्याचा आपल्याला अतिरिक्त दंड भरावा लागतो. त्यामुळे क्रेडिट कार्डची ड्यू डेट ओलांडू देऊ नका. असे केल्याने ३६ ते ४८ टक्के व्याजाची रक्कम घेतली जाते.
पैसे काढणे
जर तुम्ही सातत्याने क्रेडिट कार्डमधून पैसे काढत असाल तर ते करणे आजच थांबवा. असे केल्याने तुम्हाला पुढे जास्तप्रमाणात व्याज भरावे लागण्याची शक्यता आहे.
पेट्रोल भरताना
काही व्यक्ती पेट्रोल भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा उपयोग करतात. काही ठरावीक कंपन्या यावर परतावा आकारतात. त्यामुळे तुमच्या कंपनीबाबत याची माहिती आधी जाणून घ्या.
परदेशी शॉपिंग करताना
परदेशात गेल्यावर आपण आपल्या य़ेथील क्रेडिट कार्डच्या सहाय्याने तेथे हवी ती शॉपिंग करत असतो. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शॉपिंग करत असाल तर आधी याचा चार्ज माहीत करून घ्या. त्यामुळे तुम्ही नंतर उद्भवणाऱ्या मोठ्या खर्चाला तोंड देऊ शकता.