मुकेश अंबानींच्या Jio मध्ये जंबो भरती, मिळेल 1 लाखाच्या पगार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। Reliance Jio Recruitment: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नोकऱ्यांचा पिठारा उघडला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फिल्डमधील उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आलाय. या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. शैक्षणिक किंवा बिगर शैक्षणिक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यातील अनेक पदे अशी आहेत, जिथे नोकरी मिळाल्यास तुम्हाला लाखाच्या वर पगार मिळेल.

जिओ इंस्टिट्यूट ही मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन इंस्टिट्यूट आहे. जी ग्लोबल स्कॉलर्सला एकत्र आणण्यासोबतच वर्ल्ड क्लास एज्युकेशन, रिलेवंट रिसर्च प्लॅटफॉर्म आणि इनोव्हेशनच्या संस्कृतीसह विद्यार्थ्यांना चांगला अनुभव देण्यास प्राधान्य देते.

जिओ संस्थेत स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक भरती
जिओ संस्थेच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंटसाठी प्रोफेसरची आवश्यकता आहे. हे प्राध्यापक खेळाच्या आकड्यांचे विश्लेषण, खेळाचे आयोजन, खेळाडुंचे प्रदर्शन मॅनज करतील. यासोबतच ई स्पोर्ट आणि खेळांशी संबंधी मीडिया आणि मार्केटिंगसारखे विषय शिकवतील. विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच संस्था आणि खेळाशी संबंधित ग्रुपचे काम करावे लागेल.

पात्रता
स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने भारत किंवा विदेशातील संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. उमेदवाराला खेळाशी संबंधित कामाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असावा. यामधील 3 वर्षे कोणत्याही मोठ्या पदावर काम केलेले असावे. विदेशात काम करण्याचा अनुभव असलेल्यांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल.

प्रॅक्टीस- मॅनेजमेंट प्राध्यापक
जिओ इंस्टिट्यूटमध्ये मॅनेजमेंटला फील्डमध्ये प्राध्यापक हवेयत. जे कंपनीची स्ट्रॅटर्जी, मार्केटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट आणि डिजिटल मार्केटिंग शिकवतील. मुलांना शिकवण्यासोबतच संस्था आणि व्यवसायासंबंधीत ग्रुप्ससाठी काम करावे लागेल.

कोणत्याही कंपनीत संबंधित कामाचा अनुभव आणि जिओ संस्थेत शिकवण्याची इच्छा असावी. बिझनेस क्षेत्रात किमान 15 वर्षांचा अनुभव असावा, ज्यातील 3 वर्षे कोणत्यातरी मोठ्या पदावर काम केल्याचा अनुभव असावा. विदेशात काम करण्याचा अनुभव असलेल्यांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल.

यासोबतच फिनटेकमध्ये असिस्टंट प्रोफेसर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समध्ये प्राध्यापक, फिनटेकमध्ये प्राध्यापक, स्पेशल कलेक्शन प्रमुख म्हणजेच असिस्टंट डायरेक्टर, एचआर ऑपरेशनमध्ये एक्झिक्युटीव्ह, सीनियर एक्झिक्युटीव्ह किंवा मॅनेजर, टॅलेंट एक्विझिशनमध्ये एक्झिक्युटीव्ह, सिनीयर एक्झिक्युटीव्ह किंवा मॅनेजर, डिजीटल मीडिया आणि मार्केटिंग कम्युनिकेशनमध्ये टिचिंग आणि रिसर्च असिस्टंट ही पदे भरली जाणार आहेत.

https://careers.jioinstitute.edu.in/current-openings/Academics

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *