Amazon वर रक्षाबंधन सेल, स्मार्टफोन आणि मोबाईल अॅक्सेसरीज मिळतेय ही सूट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। Amazon India वर रक्षाबंधनाचा सेल सुरू आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोनपासून ते मोबाईल अॅक्सेसरीजव डिस्काऊंट मिळत आहे. या सेलचा फायदा उचलून तुम्ही तुमचा भाऊ अथवा बहिणीला चांगले गिफ्ट देऊ शकता. मोबाईल अॅक्सेसरीजची सुरूवातीची किंमत ७९ रूपये आहे.

मोबाईल अॅक्सेसरीजमध्ये ईअरफोन, TWS, पॉवर बँक, मोबाईल चार्ज आणि चार्जिंग केबल तुम्ही खरेदी करू शकता. येथे मोबाईलच्या अॅक्सेसरीजमध्ये अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. सोमवारी देशातील अनेक राज्यांमध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. अशातच हा सेल तुम्हाला कमी किंमतीत अनेक वस्तू देऊ शकतो.

मोबाईलवरही सूट
Amazon Indiaच्या या सेलमध्ये स्मार्टफोनवरही चांगला डिस्काऊंट मिळत आहे. या सेलदरम्यान काही मोबाईल्सवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. येथे बँक ऑफर, एक्सचेंज बोनसचा तुम्ही फायदा घेऊ शकता.

या सेलदरम्यान तुम्ही सॅमसंग, रेडमी, रिअलमी, होनर, विवोसारखे ब्रँडचे मोबाईल खरेदी करू शकता. याशिवाय अॅपलचा आयफोनही खरेदी करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *