Vastu Tips : अंगणातील ‘ही’ झाडे नकारात्मकता दूर करतील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा यावी असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी आपण देवांची पूजा अर्चा करतो. घर प्रसन्न राहण्यासाठी विविध प्रयत्न करतो. त्यात आणखी एक महत्वाचं म्हणजे घरासमोर असलेली झाडे. काहीवेळा अचानक हसत्या-खेळत्या घरामध्ये अडचणी वाढतात. घरात वाद आणि कलहांसह आर्थिक संकटं येतात.

अशावेळी पटकन हसत्या खेळत्या घराला कुणाची नजर लागली काय माहित? असा प्रश्न आपल्या मनात येतो. आपल्या घरासमोर अंगणात काही झाडे असणे महत्वाचे असते. बाजारात विविध प्रकारची झाडे मिळतात. त्यातील कोणती झाडे आपल्या घराला नकारात्मक उर्जेपासून दूर ठेवतात याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

तुळस
तुळस विविध आजारांवर गुणकारी आहे. हिंदू धर्मात आणि आयुर्वेदात सुद्धा तुळशीला फार जास्त महत्व आहे. त्यामुळे अंगणात तुळशीचे झाड असलेच पाहिजे. तुळशीचे झाड घराबाहेर असल्याने आपल्या घरावर कुणाचीही वाईट नजर पडत नाही. अशा नकारात्मक उर्जेपासून तुळस आपलं संरक्षण करते.

स्नेक प्लांट
स्नेक प्लांट हे नाव कदाचीत तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल. हे एक इनडोअर वापरलं जाणारं झाड आहे. हे झाड आपल्या घराची शोभा आणखी वाढवतं. यातील पानांमुळे आपल्या घरातील आजूबाजूची दूषित हवा शुध्द करण्याचे काम करते. याने घरातील निगेटिव्ह एनर्जी सुद्धा बाहेर फेकली जाते.

पीस लिली
पीस लिलीचं झाडं अगदी नावाप्रमाणे आहे. पीस लिली ज्या घरात असते तिथे संपूर्णता शांतीचे वातावरण पसरते. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरासमोर किंवा अगदी घरामध्ये फुलदानीत हे झाड लावू शकता. या झाडामुळे घरात कायम सकारात्मक ऊर्जा पसरत राहते.

मनी प्लांट
काही वेळा आपल्या घरातील खर्च अचानक वाढतो. काही केल्या खर्च कमी होत नाही. सतत आजारपण किंवा मग आर्थिक नुकसान वाढत राहते. त्यामुळे मनी प्लांट घरात लावाले. मनी प्लांटला वास्तुशास्त्रात विशेष महत्व आहे. याने घरातील आर्थिक स्थिती सुधारते आणि धनसंपत्तीची भरभराट होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *