महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या प्रत्येक व्यक्ती विविध आजारांनी आणि व्याधींनी त्रस्त आहे. अनेक व्यक्तींना बीपी आणि शुगरच्या समस्या आहेत. यात सर्वात कॉमन प्रॉब्लेम म्हणजे हाय कॉलेस्ट्रॉल. शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढले की विविध आजर जडतात.
वाढत्या कॉलेस्ट्रॉलमुळे ब्रेन स्ट्रोकसह हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने याबाबत काळजी घेतली पाहिजे. कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये रहावे यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलल्या पाहिजेत.
प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या आहारात चापतीचा समावेश करतात. चपाती खाल्ल्याने काहींना हाय कॉलेस्ट्रॉलचा त्रास जाणवतो. त्यामुळे आज चपातीच्या पिठात अन्य कोणत्या गोष्टी मिक्स करायला हव्यात ज्याने आपलं कॉलेस्ट्रॉल वाढणार नाही, याची माहिती जाणून घेऊ.
आळशी
आळशीच्या बिया बाजारात सर्वत्र उपलब्ध आहेत. या बिया आपल्या सेवणात असल्यास रक्त सुद्ध राहते. तसेच महत्वाचे म्हणजे याने कॉलेस्ट्रॉल वाढत नाही. ज्या व्यक्तींचे कॉलेस्ट्रॉल वाढले आहे त्यांना आळशीच्या बियांमध्ये कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आणता येतो.
चाण्याचे पीठ
चण्याचे पीठ आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. त्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे चपातीच्या पिठात काळ्या चण्याचे पीठ नक्की मिक्स करा. यामुळे आपल्या शरीरात आलेले बॅड कॉलेस्ट्रॉल कमी होते. तसेच चपाती स्वादिष्ट लागते.
ओट्स
बॅड कॉलेस्ट्रॉल शरीरातून पूर्णतः बाहेर फेकण्यासाठी आहारात ओट्सचा समावेश केला पाहिजे. तुम्ही चपातीच्या पिठात ओट्स मिक्स करून त्याचे सेवन करू शकता. यामध्ये विघटनशिल फायबर असते. शुगर, बीपी आणि लठ्ठपणा अशा अनेक समस्या याने कमी होतात. त्यामुळे ओट्सची बारीक पावडर तुम्ही चपातीच्या पिठात मिक्स केली पाहिजे.