महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ फंडात म्हणजे भविष्यनिर्वाह निधीत पैसे गुंतवले जातात. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या पगारातून काही रक्कम आणि कंपनी काही रक्कम भविष्यनिर्वाह निधीत टाकते. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात काही अडचण आल्यास या पीएफ फंडाचा वापर करता येतो. सेवानिवृत्तीनंतर पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांना मिळतात. परंतु त्याआधीही तुम्ही पीएफचे पैसे काढू शकतात. परंतु हे पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत. नुकतेच या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. (PF New Rule)
वैद्यकीय खर्चासाठी
कर्मचारी कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीत भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढू शकतात. कर्मचार, त्याची पत्नी, आई वडील यांच्या वैद्यकीय उपचारासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकतात. आपले पीएफचे पैसे त्यावरील व्याज किंवा सहा महिन्यांचा पगार यापैकी सर्वात कमी रक्कम तुम्ही काढू शकतात.
लग्नाच्या खर्चासाठी
कर्मचारी स्वतः च्या, भावंडांच्या किंवा मुलांच्या लग्नासाठी पीएफमधून पैसे काढू शकतात. तुम्ही पीएफ व त्यावरील व्याज या दोन्ही रक्कमेच्या जास्तीत जास्त ५० टक्के रक्कम काढू शकतात. यासाठी तुम्हाला कंपनीत ७ वर्ष नोकरी केलेली असणे आवश्यक आहे.
घर घेणे
तुम्ही घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी पीएफमधून रक्कम काढू शकतात. यासाठी तुम्हाला त्या कंपनीत किमान ५ वर्ष पूर्ण झालेली असावी. तुमचे घर स्वतः च्या किंवा पती-पत्नीच्या नावावर असणे गरजेचे आहे.कर्मचाऱ्यांचा ३ वर्षाचा पगार किंवा घराची रक्कम यातील जी रक्कम कमी असेल तेवढे पैसे तुम्हाला काढता येणार आहे.
घराचे नुकतीकरण
घराची दुरुस्ती किंवा नुतणीकरण करण्यासाठी तुम्ही पीएफ फंडातून पैसे काढू शकतात. कर्मचाऱ्याच्या १२ महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम तुम्ही काढू शकतात. यासाठी घर कर्मचारी किंवा पती- पत्नीच्या नावाने असणे गरजेचे आहे. (PF Withdrawal Rule)
शैक्षणिक खर्च
तुम्ही पीएफ फंडातून ५० टक्के शैक्षणिक खर्चासाठी पैसे काढू शकतात. दहावीनंतर शिक्षणासाठी तुम्ही ही रक्कम काढू शकतात. यासाठी कर्मचाऱ्यांची किंमान सात वर्षे नोकरी झालेली असावी.