Pune Water Supply : गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह अन्य टाक्यांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (ता. 22) जवळपास संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशीही (शुक्रवारी) विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा तसेच मुबलक पाणी भरून ठेवावे, असं आवाहन करण्यात आलंय. पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, जॅकवेल, पर्वती टँकर पॉइंट, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्राचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

त्यामुळे या टाक्यांवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) बंद राहील. त्याचबरोबर वारजे जलकेंद्र आणि चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकीतून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या भागातलाही पाणीपुरवठा बंद राहील.

एसएनडीटी एमएलआर व एचएलआर परिसर, चतुशृंगी टाक्यांची देखील साफसफाई केली जाईल. परिणामी त्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील पाणीसाठा (Pune Water News) बंद राहील. नागरिकांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.

बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी आधीच सतर्क होऊन पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर संबंधित टाक्यांचे देखभाल दुरुस्तीचे काम सुरु राहील. त्यामुळे शुक्रवारी सकाळी अनेक भागात कमी दाबाचे पाणीपुरवठा होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *