महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सर्वोच्च न्यायालयात १० वी पास तरुणांसाठी भरती करण्यात येणार आबे. या भरतीसाठी नोंदणी २३ ऑगस्ट २०२४ पासून सुरु होणार आहे.
या सर्वोच्च न्यायालयात भरती मोहिमेद्वारे ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदासाठी भरती केली जाणार आहे. एकूण ८० जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. कुक या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला स्वयंपाकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. उमेदवाराने कुकिंग किंवा कलनरी आर्ट्समध्ये कमीत कमी १ वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा. तसेच या क्षेत्रात काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
एससीआय ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही sci.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. १२ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.त्यानंतर उमेदवारांना कुकिंगमध्ये प्रॅक्टिकल ट्रेड टेस्ट द्यावी लागणार आहे. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीत निवड झाल्यावर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २१००० ते ६०,६७२ रुपये मासिक वेतन दिले जाऊ शकते. याबाबत सर्व माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.