![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। Gold and Silver Rate: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ग्राहकांना वाटत होते. पण, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे.
मंगळवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आणि एकाच दिवसात सोने 1400 रुपयांनी वाढले. सोन्याने एका महिन्यात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. चांदीच्या भावातही 3100 रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्याचा भाव 1400 रुपयांनी तर चांदीचा भाव 3150 रुपयांनी वाढला
जागतिक मागणीमुळे मंगळवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 1,400 रुपयांनी वाढून 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी शेवटच्या व्यवहारात सोने 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीचा भावही 3,150 रुपयांनी वाढून 87,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला, तर त्याची पूर्वीची किंमत 84,000 रुपये प्रति किलो होती.
आयात शुल्कात कपात करण्याच्या घोषणेनंतर भावात सातत्याने घसरण
2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्कात कपात केल्याची घोषणा केल्यानंतर सोन्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. 23 जुलै रोजी सोन्याचा भाव 3,350 रुपयांनी घसरून 72,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता.
दरम्यान, दिल्लीत, 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेचे सोने मागील बंद किमतीच्या तुलनेत 1,400 रुपयांनी वाढून अनुक्रमे 74,150 रुपये आणि 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
![]()
