Yerwada Metro Station: आजपासून पुण्यात वनाज ते रामवाडी मेट्रो लाईन पूर्णपणे कार्यान्वित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। पुणेकरांसाठी आनंदची बातमी आहे. त्यांच्या सुकर प्रवासासाठी आणखी एका सेवेची भर पडली आहे. वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. आजपासून येरवडा स्थानक सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून पुणेकरांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

इतर मेट्रो स्थानकांप्रमाणेच आता येरवड्यातून प्रवाशांना मेट्रोमध्ये बसता येणार आहे. प्रवासी संख्या वाढवणे आणि पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे यासाठी या स्थानकाच्या प्रवासी सेवेचा उपयोग होणार आहे. येरवडा मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याने वनाज ते रामवाडीपर्यंतची मेट्रोलाईन पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.

या स्थानकामुळे येरवडा रहिवासी भाग उर्वरित मेट्रो नेटवर्कशी आणि पुणे शहराशी जोडला जाईल. यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, कर्मचारी वर्ग, येरवडा स्थानकाच्या जवळ असणाऱ्या आयटी हबमधील कर्मचारी आणि रहिवाशांना फायदा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या सेवेत आणखी एक स्टेशन दाखल झाले असं म्हणावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *