महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात पाचजण जखमी झाल्याची घटना बुधवारी (२१ ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पिंपरीतील बौध्दनगर परिसरात घडली. जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनोज (वय १९), धिरज कुमार (वय २३), गोविंद राम (वय २८), राम शिलाराम (वय ४०) आणि समेंदर राम (वय ३०, सर्व रा. बौद्धनगर, बिल्डींग नं. १६ च्या मागे, पिंपरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत, पिंपरी-चिंचवड अग्निशामक केंद्राला कोणतीही माहिती नागरिकांनी दिली नाही. मात्र, गॅस गळती होऊन या गॅसचा आगीशी संपर्क आल्याने हा स्फोट झाला अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.