![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ ऑगस्ट ।। आधार कार्ड हे इतके महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे की त्याशिवाय आपली अनेक कामे ठप्प होतात. आपल्याकडे आधार कार्ड नेहमीच असणे गरजेचे नाही, तुम्हाला अचानक आधारची गरज पडली, तर तुम्ही काय कराल? तुम्ही म्हणाल की ही UIDAI ची अधिकृत साइट आहे, या साइटवर आधार कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे, तुम्ही ते येथून डाउनलोड कराल.
आता समजा तुम्ही युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत साइटच्या मदतीने तुमचा आधार डाउनलोड केले आहे, पण आता तुम्ही हे ई आधार कार्ड कसे उघडणार? ई-आधार कार्डची पीडीएफ फाईल उघडणे इतके सोपे नाही, कारण ही फाईल सरकारने संरक्षित ठेवण्यासाठी ती लॉक केली आहे, लॉक म्हणजे पासवर्ड.
प्रत्येक व्यक्तीच्या पीडीएफ फाइलचा पासवर्ड वेगळा असतो, मग आता तुम्हाला माहिती आहे का तुमच्या ई आधार कार्डचा पासवर्ड काय आहे? जर नसेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही, आज आम्ही तुम्हाला हे कसे सहज शोधू शकता याबद्दल माहिती देणार आहोत.
लोकांच्या सोयीसाठी, ई-आधार उघडण्याची पद्धत UIDAI च्या अधिकृत साइटवर उदाहरणाद्वारे स्पष्ट केली आहे. पीडीएफ फाईल उघडण्यासाठी नावाची पहिली चार अक्षरे आवश्यक असून, जन्मवर्षासोबतच नावाच्या पहिल्या चार अक्षरांसह जन्मवर्षही टाकावे लागेल.
उदाहरण: जर नाव ROHIT KALE असेल आणि जन्म वर्ष 1992 असेल, तर ई-आधार कार्डची PDF फाईल उघडण्यासाठी तुम्हाला ROHI1992 पासवर्ड टाकावा लागेल. हा 8 अंकी पासवर्ड टाकताच PDF फाईल उघडेल.
पासवर्ड सेट करण्याची का आहे गरज ?
UIDAI तुमचा ई-आधार फाइल पासवर्ड संरक्षित ठेवते आणि असे करण्यामागील कारण म्हणजे तुमच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचे रक्षण करणे. ई-आधारमध्ये दिलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी फाइलवर लॉक अर्थात पासवर्ड टाकला जातो.
