महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर, अमरावती आणि वाशिममध्ये जाणार आहेत. नागपूरमध्ये राज ठाकरेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात, फटाके फोडत राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. आज रवीभवन इथे राज ठाकरे मनसे पदाधिका-यांसोबत बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
शरद पवार कारणीभूत
पुरोगामी महाराष्ट्राचा उलटा प्रवास सुरु आहे.जातीयवाद, फोडाफोडी राजकारण सुरु आहे. सगळ्याला शरद पवार जबाबदार आहेत.जातीवादाचे राजकारण पवारांनी सुरु केले. राष्ट्रवादीजन्मानंतर 1990 नंतर ते सुरु झाले. राजकारणापर्यंत मर्यादित न रहाता हा विषय घरा घरात घुसलाय असे ते म्हणाले. राजकारणाचा सध्या चिखल झालाय. गणेश नाईक, नारायण राणे गेले त्याला शरद पवार कारणीभूत आहेत. मी सर्व मतदारसंघात उमेदवार देणार, असे राज ठाकरे म्हणाले.
मनसेला मत का मिळत नाही?
माझ्या हाती सत्ता द्या असे तुम्ही सांगता पण मतदार सत्ता देत नाही. यावर राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. 1952 पासून भाजपदेखील हेच म्हणत आली. त्यांना 2014 साली सत्ता मिळाली. मलापण मिळेल असे ते म्हणेल.
लोक मत देतील असे वाटत नाही
यावेळी लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारवर त्यांनी टीका केली.लोक हुशार आहे. मतदान देतील असे वाटत नाही, असे ते म्हणाले.लोकं खूप हुशार आहेत.पैसे मिळत असतील तर नक्की घेतील पण मत देणार नाहीत, असे ते म्हणाले. बदलापूरसारखी घटना घडल्यानंतर अनेक घटना समोर आल्या. एक घटना आल्यावर फटाक्यांची माळ कशी लागते? असा प्रश्न त्यांनी विचारला.
वरळीत मनसे उमेदवार देणार
विधानसभेत 225 जागा लढवणार असल्याचे ते म्हणाले. निवडून येतील अशा ठिकाणी महिलांनादेखील संधी देणार आहोत. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघातदेखील मनसे निडणूक लढवणार आहोत. माझे त्या मतदार संघात 37 हजार मतदार आहेत असे ते म्हणाले.
कारवाई कुणावर झाली?
अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला त्यावेळी कारवाई कुणावर झाली? पोलीसांना सुचलं का लाठीचार्ज करावं? असा प्रश्न विचारत त्यांनी राज्यातील गृहमंत्रालयावर प्रश्न उपस्थित केला.