महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते नागपूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबतही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.
लोकांना कामाला लावा. ते फुकटचे पैसे मागत नाहीत. शेतकरी फुकटचे पैसे मागत नाही, विज मागत नाही. त्याला फक्त विजेमध्ये खंड नको. लोकांना आधी विचारा त्यांना काय हवं आहे. तुम्हाला मतं हवेत म्हणून काहीही करणार का? पण तुम्ही जे पैसे देता तो लोकांचा टॅक्स आहे. असं करू कसं चालेल, असं राज ठाकरे म्हणाले.
राज्यात असंख्य जॉब आहेत, पण आपल्या लोकांना कळवलं जात नाही. सरकारची ही पद्धत धोकादायक आहे. मध्य प्रदेशमध्ये फक्त लाडकी बहीणमुळे विजय मिळालेला नाही. त्यासाठी इतर गोष्टी देखील जबाबदार असतात. एकाच योजनेमुळं असं काही होत नसतं, असं राज म्हणाले.
पहिला महिना जाईल, दुसरा महिना कदाचित जाईल. सरकारकडे पैसाच नाही द्यायला. त्यात अजित पवार यांनी म्हटलंय की, निवडणूक दिलं तरच पुढचं होईल. असं काही होणार नाही. राज ठाकरे यांनी यावेळी अजित पवार यांची मिमिक्री केली.