महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। सोशल मिडिया या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन गाणी ट्रेडिंगमध्ये आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘आप्पाचा विषय लय हार्ड आहे’ या गाण्याने धुमाकूळ घातलाय. कुटुंबामध्ये घरातील मोठ्या व्यक्तीला ‘आप्पा’ असे म्हणतात. यामुळेच आप्पाचा विषय़ लय हार्ड आहे म्हटंल्यावर लहानापासून मोठ्या मंडळीपर्यंत सर्वजण या गाण्यावर मजेशीर रिल्स बनवत आहेत. महिलादेखील हटके स्टाईलमध्ये या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे गाणं कसं झाला ट्रेंड?
इन्स्टाग्राम ओपन केल्यावर तुम्हाला ‘आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाय ध्यान पण आप्पाचं बाहेर लय लाड आहे’ हे गाणं ऐकायला मिळतं. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. परंतू हे गाणं कोणी गायलंय? या गाण्याचा मूळ गीतकार कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. तर आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.
कोण आहे मूळ गाण्याचा गीतकार?
सोशल मीडियावर सध्या कन्टेट क्रिएटर,ब्लॉगर आणि रिलस्टार यांनी त्याचं वर्चस्व निर्माण केलं आहे. विविध माध्यमांद्वारे ते आपली माहिती,संदेश,लाईफस्टाईल विषयीची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. असाच एक युट्युबर म्हणजे वरदान. त्याने हे गाणं गायलं आहे. सोशल मिडिया युट्यूबवर त्याने हे गाणं पोस्ट केलय ज्याला नेटकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. एक महिन्यात या गाण्याला १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.