महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणेकरांना आता अवघ्या 55 मिनिटांत कोकणात तर 75 मिनिटांत गोव्यात पोहोचता येणार आहे. त्यामुळं आता पुणेकरांचा प्रवास जलद व आरामदायी होणार आहे. पुण्याहून सिंधुदुर्गासाठी विमान सेवा सुरू होत आहे. तर, गोव्याच्या विमान सेवेचा विस्तार होत आहे. 31 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होणार आहे.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप असते. आता गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही खूप असते. या काळात ट्रेन, बसच्या बुकिंग फुल असतात. अशावेळी पुण्याच्या रहिवाशांना कोकणात जाण्यासाठी हवाई सेवा आता उपलब्ध आहे. 31 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होणार आहे. शनिवारी आणि रविवारी या दोन्ही शहरांसाठीची सेवा उडानअंतर्गंत सुरू होत आहे.
कोकण आणि गोवासाठी असणाऱ्या विमान सेवेसाठी बुकिंग अवघ्या 1 हजार 991 रुपयांत करता येणार आहे. तुम्हाला फक्त 2 हजार रुपयांत प्रवास करता येणार आहे. यासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू झाली आहे.
विमानसेवेच्या अशा आहेत वेळा
सिंधुदुर्गची वेळ
फ्लाइट (आयसी ५३०२) पुण्याहून सकाळी ८ वाजून ०५ मिनिटांनी उड्डाण, सिंधुदुर्गला सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.
फ्लाइट (आयसी ५३०३) सिंधुदुर्गहून सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी, पुण्याला १० वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.
गोव्याची वेळ
फ्लाइट (आयसी १३७५) पुण्याहून सकाळी १० वाजून ५५ उड्डाण
फ्लाइट (आयसी १३७६) गोव्याहून सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी उड्डाण, पुण्याला सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल.