महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। पुण्यातील जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोपोडी येथे एसटी बस आणि चार चाकी वाहनाचा समोरासमोर धडक देऊन अपघात झाला. या अपघातात 12 व्यक्ती जखमी असून एक महिला गंभीर जखमी आहे जखमींना ससून रुग्णालय आणि जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेला आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघात ग्रस्त दोन्ही वाहने बाजूला काढण्यात आलेली आहे.. याबाबतीत खडकी पोलीस स्टेशन तपास करत आहे.