![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि.२४ जानेवारी |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
तुमचा सल्ला घेतला जाईल. मनातील इच्छा पूर्ण करण्यावर भर द्याल. तुमचा चाहतावर्ग वाढेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक प्रश्न सुटेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
कार्यक्षेत्र विस्तारण्यावर लक्ष द्यावे. कामासाठी लहान प्रवास करावा लागेल. स्वत:च्या मताचा हक्क गाजवाल. कामाची लगबग राहील. शेजार धर्म पाळाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
योग्य मार्गदर्शन मिळेल. गुरुकृपेचा लाभ घ्याल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. मदतीला धावून जाल. सामाजिक जाणीव ठेवाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
छुप्याशत्रूंवर लक्ष ठेवावे. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. निष्ठा ढळू देवू नका. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कौटुंबिक शांतता राखावी.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
प्रेमसौख्याला रंग चढेल. व्यापारी संस्थांवर लक्ष ठेवा. मुलांना प्रवासात सहाय्य कराल. कामाला अधिक गती येईल. खर्च वाढू शकतो.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
संघटन कार्यात यश येईल. स्पर्धेत यश मिळवाल. कामगार वर्ग खुश असेल. पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
लहान प्रवास चांगला होईल. कामात आईची साथ लाभेल. आवडते छंद जोपासाल. महत्त्वाची कामे पुढे सरकतील
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. घरात मंगलकार्य निघेल. कौटुंबिक वातावरणात रमाल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
वादन कलेला चांगला वाव मिळेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. माहितीचा योग्य वापर करावा. भावंडांची मदत घ्याल. प्रवास मजेत होईल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
बँकेचे काम कराल. गुंतवणुकीच्या कामात लक्ष घालाल. शेअरमधील गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार कराल. कौटुंबिक सौख्यात रमाल. आवडीच्या गोष्टींवर भर द्याल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
इतरांवर तुमचे प्रभुत्व राहील. पत्नीशी वाद वाढवू नयेत. अपचनाचा त्रास जाणवेल. भागादारीतील बदल सकारात्मक विचारातून करावेत. किरकोळ वाद टाळावेत.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
ध्यानधारणा करण्यावर भर द्यावा. सामाजिक बांधिलकी जपाल. कामाच्या बाबतीत संतुष्ट असाल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. मानसिक शांतता जपावी.