आता शाळा, वसतीगृहात पॅनिक बटण असेल ; दीपक केसरकर यांची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुली, महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सोमवारी सांगितले की, शाळांमध्ये सीसीटीव्हींप्रमाणेच (CCTV) सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणदेखील (panic button) बसवले जाऊ जाऊ शकते. हे पॅनिक बटण दाबल्यानंतर पोलिसांनी लगेच गैरप्रकाराची माहिती कळेल. 

“…शाळांमध्ये जसे सीसीटीव्ही आहेत; तसे महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणची व्यवस्था केली जाऊ शकते… हे पॅनिक बटण वसतिगृहातही बसवता येऊ शकते. हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे.” असे केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *