महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सभासदांच्या पाल्यांचे दहावी-बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – परळी – ता. १८ – महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या शाखा औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ येथील सभासदांच्या पाल्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले .दहावी (CBSE) बोर्डाचा आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला.

दहावी ( CBSE ) बोर्डाच्या परीक्षेत वैभव संजय भगत ९४ % राजस्थानी पोदर लर्न स्कुल, तेजस राजेश भोकरे,९२%,यश दीपक शिंदे,भेळ सेकंडरी स्कुल,परळी येथील विध्यार्थीनी दैदिपमान यश प्राप्त केले तर नांदेड येथून कु.अदिती संभाजीराव बुक्तारे, यांची कन्या 91% मार्कस घेऊन घवघवीत यश प्राप्त केले.

गुरुवारी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निघालात रोहन महादेव वंजारे , आनंद बप्पासाहेब वडमारे यांनी व कु.तेजस्वी पंढरी यंगलोड ह्यांनी घवघवीत असे यश प्राप्त केले आहे. सामाजिक, शैक्षणिक स्तरातून व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे तसेच संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यातर्फे व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे सर्व यशस्वी विद्यार्थाना पुढील शैक्षणिक वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *