![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑगस्ट ।।अटल सेतूनंतर महाराष्ट्राच्या विकासात आणखी एक सुवर्णपान जोडले जाणार आहे. कारण, राज्यातील पहिला डबल डेकर पूल तयार करण्यास पाण्यात देण्यात आली आहे. एकाच खांबावर मेट्रो ब्रीज आणि वानहनांसाठी ब्रीज तयार करण्यात येईल. असा प्रकराचा राज्यातील पहिलाच प्रयोग असेल. एमएमआरडीएकडून (Mumbai Metropolitan Region Development Authority) मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील पहिला डबल डेकर पूल भाईंदर (bhayandar news) खाडीत तयार केला जाणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या निर्णयामुळे वसईतील मेट्रोचा मार्गही सुकर होईल. दोन्ही पूल एकाच मार्गातून असल्याने सरकारच्या तिजोरीवरील भार थोडा कमी होणार आहे.
वसई शहरांमध्ये (vasai Metro) मेट्रो यावी याकरिता मेट्रोमार्ग 13 ची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. त्यावेळीच मीरा भाईंदर ते वसई विरार (Mumbai Metro) हा मेट्रोमार्ग एकमेकांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मीरा रोड ते विरार हा 23 किलोमीटरचा मेट्रोमार्ग असून त्यामध्ये 20 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. भाईंदर नायगांव मेट्रोसहित खाडीपूल करण्याबाबतचा संरचनात्मक आराखडा तयारीचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
MMRDA कडून भाईंदर – नायगावच्या मध्ये डबल डेकर ब्रीज तयार करण्यात येणार आहे. या ब्रीजवर 3+3 लेन असतील. हा डबल डेकर ब्रीज जवळपास ५ किमी लांब आणि 30.60 m रुंदी असेल. या डबल डेकर ब्रीजच्या वरच्या डेकवर मेट्रो रेल्वे आणि खालच्या डेकवर वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्ता असेल. हा राज्याच्या विकासाचा नवा अंक ठरेल. डबल डेकर ब्रीजमुळे वसई विभागातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
एकनाथ शिंदे यांनी यांनी 9 जुलै 2024 रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. ते MMRDA चे अध्यक्ष देखील आहेत. या प्रकल्पावर सध्या काम सुरु आहे. याबाबतचा आरखडा सल्लागारांच्या मदतीने तयार करण्यात येत आहे.