महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑगस्ट ।। काही उलटसुटल खाल्लं की, अनेकांना त्याचा त्रास होतो. आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यावेळी प्रामुख्याने जाणवणारा एक त्रास म्हणजे एसिडीटी आणि गॅसेसचा त्रास होतो. गॅसेसचा त्रास झाल्यावर पोटदुखी आणि अस्वस्थता देखील जाणवू लागते.
जर तुम्हालाही सतत गॅसेसचा त्रास होत असेल तर तुम्ही हे उपाय करून बघू शकता. पोटात गॅसमुळे होणा-या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, त्यापैकी एक म्हणजे एक्यूप्रेशर. एक्यूप्रेशर ही एक जुनी प्राचीन वैद्यकीय पद्धत आहे, ज्यामध्ये शरीराच्या विशिष्ट पॉईंट्सवर प्रेशर देऊन शरीराचं अवयव एक्टिव्ह केले जातात. जाणून घेऊया ही पद्धत नेमकी कशी आहे.
गॅसेसच्या त्रासावर प्रभावी एक्यूप्रेशर पॉइंट्स
ST36: हा पॉईंट्स तुमच्या शिनबोनच्या बाहेर आणि गुडघ्याच्या खाली चार बोटांच्या अंतरावर आहे. हा पॉइंट दाबल्याने पचनक्रिया मजबूत होण्यास आणि पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते.
SP6: हा पॉईंट घोट्याच्या आतील आतील बाजूला आहे. यामध्ये घोट्याचं हाड आणि अकिलीस टेंडन दरम्यान येतो. या पॉईंटवर प्रेशर दिल्याने पोट फुगणं, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
CV6: हा पॉईंट् तुमच्या नाभीच्या खाली सुमारे दोन बोटांच्या अंतरावर मध्यरेषेवर असतो. हा पॉईंट दाबल्याने पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. तसंच गॅसेसचा त्रास असेल तर पोटदुखी कमी होते.
BL21: गॅसेसच्या त्रासावर अजून एक प्रेशर पॉईंट म्हणजे खांद्याच्या खालच्या कोपऱ्यात काहीसा खालच्या भागात असतो. या पॉईंटवर प्रेशर दिल्याने शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सुधारण्यास आणि पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते.
एक्यूप्रेशर कसं करावं?
एक्यूप्रेशरची पद्धत वापरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आरामदायक स्थितीत झोपावं लागेल.
प्रत्येक पॉईंटला तुमची बोटं किंवा अंगठ्याच्या सहाय्याने हळू-हळू दाबा. या पॉईंट्सवर काहीसं प्रेशर आल्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात वेदना होतात.
यावेळी प्रत्येक पॉईंटला केवळ १-२ मिनिटं दाबा.
दिवसातून तुम्ही १-२ वेळा या पद्धतीचा वापर करू शकता.