महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे- ता. १९ – : आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्वाचे मानले जाते. कोणतेही काम करण्यासाठी आधार कार्ड गरजेचे असते. काम सरकारी असो वा खासगी आपली ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड मागितले जाते. आता आधार कार्ड वापरणाऱ्यांच्या सुविधेसाठी ट्विटरवर त्यांच्या प्रश्नांची व समस्यांची उत्तरे मिळणार आहेत.
नवे आधार कार्ड बनवत असताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. कधी नाव चुकते, तर कधी जन्म तारीख, ते पुन्हा दुरुस्तीला दिल्यानंतर येईपर्यंत आधार कार्ड वापरणाऱ्यांना प्रश्न पडतात, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आधारने ही सुविधा सुरू केली आहे.
आधारशी संबंधित सर्व अडचणी युआयडीएआय द्वारे हाताळल्या जातात. आपल्याकडे आधार कार्डशी संबंधित कोणताही प्रश्न किंवा समस्या असल्यास आपण त्यास ट्विट करुन जाणून घेऊ शकता. यासाठी आपण @IDAIAI आणि @Adhaar_Care वर ट्विट करू शकता. याशिवाय आधार केंद्राच्या प्रादेशिक कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडलदेखील देण्यात आले आहे. येथे आपण आपली तक्रार देखील करू शकता.
आधारची ही सेवा ग्राहक सेवा, फोन नंबर आणि मेल आयडीपेक्षा वेगळी आहे. युआयडीएआयचा ग्राहक सेवा क्रमांक १९४७ आहे. याशिवाय help@uidai.gov.in वर ईमेल पाठवूनही माहिती मिळू शकते.
युआयडीएआयने सर्व सुविधा ऑनलाईन सुरू केल्या आहेत. नाव बदलणे, फोन नंबर बदलणे किंवा आधार कार्डमधील इतर कोणतीही माहिती बदलणे, ही सर्व कामे ऑनलाईन करता येतात.