महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। OBC Reservation: मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राला ओबीसी कल्याण संघटनेने आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, मराठ्यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र स्थगित करा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली असून या याचिकेवर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर १० सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.(Maratha In Obc Reservation)
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. राज्य सरकारच्या या अधिसूचनेला आक्षेप घेत ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या अधिसूचनेत मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणवी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली असून याला याचिकेद्वारे विरोध करण्यात आला आहे.(sagesoyare Reservation)
मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज (ता. २८) या याचिकेवर सुनावणी ठेवण्यात आली होती. महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी या याचिकेवर सुनावणीसाठी वेळ मागून घेतली. खंडपीठाने १० सप्टेंबरला सुनावणी निश्चित केली.