महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। सप्टेंबर महिना सुरु व्हायला काहीच दिवस उरले आहेत. सप्टेंबर महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी बघून जा. सध्या बँकांची अनेक कामे ऑनलाइन पद्धतीने होतात. मात्र, काही महत्त्वाच्या कामांसाठी ग्राहकांना बँकेत जाने लागते. तुमचे जर बँकेत काही काम असेल तर बँकांच्या कामाचे दिवस बघूनच जा.
सप्टेंबर महिन्यात बँका सण आणि वीकेंडला बंद राहणार आहे. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, दुसरा आणि चौथा शनिवार तसेत रविवार पकडून विविध राज्यांमध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात गणेसोत्सव, ईद असे सण आहेत. त्यामुळे विविध राज्यात बँका बंद राहणार आहेत.
सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी
४ सप्टेंबर
श्रीमंत शंकरदेवची तिरुभव तिथीनिमित्त आसामध्ये बँका बंद राहणार आहेत.
७ सप्टेंबर (शनिवार)
गणेश चतुर्थीनिमित्त गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटत, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोव्यात बँका बंद राहणार आहेत.
१४ सप्टेंबर (दुसरा शनिवार)
कर्म पूजा/ वहिला ओनमनिमित्त संपूर्ण देशभरात बँका बंद राहणार आहेत.
१६ सप्टेंबर(सोमवार)
ईद-ए- मिलानिमित्त गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, केरळ, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये बँका बंद राहणार आहेत.
१७ सप्टेंबर
ईद-ए मिलाद (मिलाद-उन-नबी)निमित्त सिक्किम, छत्तीसगढमध्ये बँका बंद राहणार आहेत.
१८ सप्टेंबर
पंग-लहबसोलनिमित्त सिक्किममध्ये बँका बंद राहणार आहेत.
२० सप्टेंबर
ईद ए मिलाद-उल नबीनंतर शुक्रवारी जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.
२१ सप्टेंबर
श्री नारायण गुरु समाधी दिवसनिमित्त केरळमध्ये बँका बंद राहणार आहेत.