Badlapur Case : बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेविषयी संतापजनक माहिती, आणखी एका …..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून दोन चार वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर बदलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. आता या बदलापुरातील या प्रकरणात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार केलेल्या आरोपी अक्षय शिंदेने शाळेतील आणखी एका चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आणखी एका चिमुकलीवर केलेल्या दुष्कृत्यानंतर त्याच्यावर अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधी दोन लहान मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल झाला असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी राज्य सरकारने एसआयटी नेमली आहे. त्याशिवाय आता आणखी एका मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आल्यानंतर एसआयटीकडून आरोपी अक्षय शिंदेविरोधात पुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.

चिमुकल्यांवरील अत्याचारचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येत आहे. याबाबतची सुनावणी २७ ऑगस्टला झाली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणात केवळ एकच नव्हे, तर अनेक त्रुटी झाल्या असल्याचं सांगितलं. तसंच पोलिसांनीही पोक्सो कायद्यांतर्गत असलेल्या कायदेशीर प्रक्रियेचं पालन केल्याचं दिसत नसल्याचं सांगत पोलिसांच्या कामावरही ताशेरे ओढले. पोक्सो कायद्यातील तरतुदीप्रमाणे ज्या व्यक्तीला गुन्हा घडल्याचं दिसतं त्याने तात्काळ पोलिसांना कळवणं गरजेचं असतं. मात्र या प्रकरणात वर्ग शिक्षिकेनेही ते केलं नाही, त्यामुळे हा कायद्याचा भंग झाला असल्याचं कोर्टाने म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *