(औरंगाबाद ) संभाजीनगर; लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी जवळपास 10 हजार कोरोना टेस्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संभाजीनगर – ता. १९ – : संभाजीनगर येथे लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी महापालिकेच्या वतीने शहरात जम्बो कोरोना टेस्ट मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात तब्बल 9 हजार 903 लोकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या, त्यापैकी 252 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये 85 व्यापाऱ्याचाही समावेश आहे. संभाजीपेठ येथील केंद्रावर सर्वाधिक 25 विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी महापालिकेने शहरात 10 जुलैपासून 18 जुलै पर्यंत 100% लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याचा शनिवारी शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी महापालिकेच्या यंत्रणेने शहरात जागोजागी अँटिजेन पद्धतीच्या कोरोना टेस्टची मोहीम राबविली. शहरातील भाजीपाला, किराणा, चिकन, मटण, अंडी, दूध या विक्रेत्यांना रविवारपासून दुकाने उघडण्यासाठी कोरोना तपासणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे या तपासण्यासाठी शहरात 22 ठिकाणी शिबिर घेण्यात आले, त्यात दिवसभरात 4274 विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातील 85 जणांचा अहवाल पॉझिटिव आला. त्यांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले. यामध्ये संभाजीपेठ येथील नाथ सुपर मार्केट मधील शिबिरात सर्वाधिक पंचवीस विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले.

त्यापाठोपाठ रामनगर येथे 14 आणि संभाजी कॉलनी येथे 14 विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच महापालिकेने शहरातील 6 चेक पॉईंट आणि इतर काही वसाहतींमध्ये सामान्य नागरिकांसाठीही तपासणी मोहीम राबविली. त्यात 5 हजार 629 लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 167 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांनाही मनपाच्या कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *