Devendra Fadnavis: लोकसभेतील ओव्हर कॉन्फिडन्स नडला, अजित पवार आल्याने… फडणवीसांचं धक्कादायक वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्यातही लोकसभेत मोठा झटका अनुभवलेल्या महायुतीने आता सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला खूप मोठा धक्का सहन करावा लागला. त्याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तेव्हा आम्ही ओव्हर कॉन्फिडन्ट होतो. पण, आता चित्र बदललं आहे.

राज्यात महायुतीचंच सरकार येईल, फडणवीसांना विश्वास
न्यूज १८ इंडिया डायमंड स्टेट्स समिट महाराष्ट्र या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेत नेमकं काय आणि कुठे चुकलं हे सांगितलं आहे. लोकसभेनंतर राज्यातील चित्र बदललं आहे. विधानसभेत महायुती चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, राज्यात महायुतीचंच सरकार येईल असंही ते म्हणाले.

लोकसभेत उमेदवार जाहीर करायला उशीर झाला
अजित पवार सोबत आल्याने संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना समजावण्यात वेळ गेला. त्यामुळे लोकसभेत उमेदवार जाहीर करायलाही उशीर झाल्याचं ते म्हणाले.

लोकसभेत आम्ही ओव्हर कॉन्फिडन्ट होतो, फडणवीसांची कबुली
लोकसभा निवडणुकांवेळी कार्यकर्ते म्हणून आम्ही ओव्हर कॉन्फिडन्ट होतो. देशात आम्ही निवडून येत आहोत, अशी स्थिती होती. त्यामुळे महाराष्ट्रातही निवडून येणार, असा माहोल होता. त्यामुळे ज्या क्षमतेने काम करायला हवं होतं, ते आम्ही केलं नाही. आपण आणखी क्षमतेने काम करायला हवं होतं, हे आता कार्यकर्त्यांनाही कळालं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भाजप ही गुंडांची, वसुली करणाऱ्यांची पार्टी झाली आहे हे नारायण राणेंनी सिद्ध केलंय, भास्कर जाधवांची टीका

अजित पवार आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
जेव्हा अजित पवार महायुतीत आले, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. इतकी वर्ष ज्यांच्याविरोधात लढलो, आता त्यांच्यासोबतच मतं कशी मागायची, असा प्रश्न त्यांना पडला होता. हा संभ्रम दूर व्हायला वेळ लागला. कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागला. पण, आता परिस्थिनी बदलली आहे. कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टी समजल्या आहेत. असंही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *