महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ ऑगस्ट ।। सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या गरीब आणि गरजू लोकांसाठी असतात. केंद्र सरकारची एक योजना आहे. ज्यात गरीब लोकांना मोफत रेशन दिले जातात.सर्व शिधापत्रिकाधारकांना रेशन दिले जातात.मात्र, आता या निर्णयात आता बदल झाला आहे. पूर्वी सरकार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिले जाते.
यापूर्वी रेशन कार्डवर फक्त तांदूळ दिले जातात. परंतु आता तांदळाऐवजी ९ जीवनावश्यक गोष्टी देणार आहे. यामध्ये कोणत्या गोष्टी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे ते जाणून घ्या.
शिधापत्रिकाधारकांना या गोष्टी दिल्या जाणार आहेत
भारत सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत देशातील तब्बल ९० लाख लोकांना मोफत रेशन दिले जाते. रेशनच्या नियमांमध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत. आता शिधापत्रिकाधारकांना ९ जीवनावश्यक गोष्टी दिल्या जाणार आहेत.
यामध्ये गहू,डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले या पदार्थांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य चांगले होण्यासाठी आणि त्यांच्या शरीरातील पोषण वाढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांचे जीवन सुधारणार आहे.
रेशन कार्ड कसे बनवता येईल?
जर तुम्ही अजूनही रेशन कार्ड बनवले नसेल तर तुम्ही ते बनवू शकतात. यासाठी तुम्हाला शिधापत्रिकेसाठी अर्ज करावा लागेल. तुम्हाला जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्ही अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरुनदेखील अर्ज डाउनलोड करु शकतात.
या अर्जामध्ये सर्व माहिती भरावी लागेल.त्यानंतर काही कागदपत्रे जोडावी लागतील. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला रेशनिंग कार्यालयात जमा करावे लागतील. तेथील अधिकारी तुमची सर्व माहिती आणि अर्जाची पडताळणी करतील. त्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल.