महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – पुण्यात २३ तारखेनंतर लॉकडाऊन नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तसेच गर्दी टाळण्यासाठी विशिष्ठ उपाययोजना आखणार आहे. प्रतिबंधक क्षेत्रात निर्बंध कायम राहणार आहे. पुणे शहरात या लॉकडाऊनमुळे फायदा झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
पुणे शहरात व्हेंटिलेटर पुरेसे आहेत. कुठे व्हेंटिलेटर कमी पडत असतील तर चौकशी करून व्हेंटिलेटरची सोय करू. जा रुग्णाला सौम्य लक्षणं आहेत त्यांना घरीच क्वारंटाइन करणार असल्याचेही त्यांनी केले.
रोज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यातही रुग्ण वाढत होते, याच पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.