महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – सराफा बाजार सुरु होताच सोन्याच्या दरांत काहीशी घसरण पाहायला मिळाली. सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याच्या किंमतीत जवळपास 74 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरात 101 रुपयांची घसरण झाली. MCXवर सोन्याचा दर 48893 प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदी 52798 रुपये प्रति किलो इतकी आहे.
कोरोना व्हायरस, जागतिक घडामोडी आणि इतर काही कारणांमुळे गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनुसार, गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 179 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरणीची नोंद झाली होती. तर चांदीच्या किंमतीतही 40 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी घसरण झाली होती.
दरम्यान, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक केल्यास येत्या काही दिवसांत चांगलं उत्पन्न मिळू शकेल, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, सोन्यातील सर्व मूलभूत तत्त्वं आणि मागणीदेखील या वेळी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे MCXवर दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 52000 रुपयांपर्यंत पोहचू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
