iPhone 16 Pro Max : अ‍ॅपलच्या सुपर प्रीमियम फोनची झलक! iPhone 16 Pro Maxचा व्हिडिओ लीक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ ऑगस्ट ।। Apple iPhone New Smartphone Launch : iPhone 16 सीरीजच्या लाँचला आता काहीच दिवस बाकी आहेत. या सीरीजमधील सर्वांत महागड्या फोन, iPhone 16 Pro Max चा एक डमी व्हिडिओ ऑनलाईन समोर आला आहे. या डमीमुळे फोनच्या डिझाईनची पहिली झलक पाहायला मिळत आहे.

येत्या 9 सप्टेंबरला iPhone 16 सीरीज जगभरात लाँच होणार आहे. या नवीन सीरीजमध्ये अ‍ॅपल चार मॉडेल्स सादर करणार आहे – iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max. लाँचच्या काही दिवस आधीच iPhone 16 Pro Max ची झलक असणारा एक डमी सोशल मीडियावर व्हिडिओच्या रुपात लीक झाला आहे. त्याचबरोबर आम्ही Gadget 360चा एक यूट्यूब व्हिडिओही जोडला आहे. जेणेकरून तुम्हाला iPhoneच्या या सीरिजबद्दल अधिक माहिती मिळेल.

डिझाईन काय आहे खास?
एका यूट्यूब चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये iPhone 16 Pro Max ची डमी ‘डेझर्ट टायटॅनियम’ रंगामध्ये दाखवली आहे. आधी लीक झालेल्या सोनेरी आणि ब्राऊन रंगाच्या डमीपेक्षा हा रंग वेगळा आहे. Pro मॉडेलप्रमाणेच या Pro Max मॉडेलमध्येही मॅट टेक्सचर आणि क्रोम फिनिश आहे.

स्पेसिफिकेशन्स
काही रिपोर्ट्सनुसार, iPhone 16 Pro Max मध्ये 6.9 इंचांचा डिस्प्ले असू शकतो. तसेच, हा फोन सर्वात पातळ बेझेल असलेला पहिला फोन असण्याची शक्यता आहे. यामुळे एज-टू-एज डिस्प्ले अनुभव मिळणार आहे. यामध्ये A18 Bionic चिपसेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा सपोर्ट असण्याचाही अंदाज आहे. त्यासोबतच, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, टेट्रा प्रिझम टेलीफोटो कॅमेरा आणि 4,676mAh ची मोठी बॅटरी असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये आणखी अनेक महत्त्वाचे अपग्रेड्स अपेक्षित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *