महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ सप्टेंबर ।। बदलापूरच्या एका शाळेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला होता. या घटनेंचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. आरोपी अक्षय शिंदे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. बदलापूर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. यात आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलींसमोर ओळख परेड झाली आहे. यानंतर आरोपीच्या गुन्ह्यावर शिक्कामोर्तब होण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
अक्षय शिंदेची अखेर ओळख परेड
बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची अखेर ओळख परेड झाली.कल्याण न्यायालयमध्ये एका विशिष्ठ रूम मध्ये ही ओळख परेड झाली. विशेष म्हणजे यात आरोपी पीडित मुलींना पाहू शकत नव्हता.मात्र मुली आरोपीला पाहू शकत होत्या. अशा पद्धतीने कोर्ट रूममध्ये काळजी घेण्यात आली होती. बदलापूर प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआटीने न्यायालयात आरोपीच्या ओळख परेडसाठी परवानगी मागितली होती,त्यानुसार ही ओळख परेड झाली.