महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑक्टोबर ।। अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वतःच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागल्याने त्याला पायाला दुखापत झाली आहे. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
परवानाधारक बंदुकीचा ट्रीगर अनावधानाने दाबला गेला, त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटली. ती गोविंदाच्या पायाला लागली. जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तो सुखरूप असल्याचे समजते. याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.
Actor Govinda hospitalised after sustaining bullet injury on leg from his revolver: Mumbai police
— Press Trust of India (@PTI_News) October 1, 2024
गोविंदा जुहू बंगल्यावर एकटाच असताना ही घटना घडली. पहाटे ४:४५ वाजता घरातून घाईगडबडीत निघताना हा प्रकार घडला. त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीमधून सुटलेली गोळी लागल्याची प्राथमिक महिती आहे. याप्रकरणी कोणाचीही तक्रार नसून सध्या गोविंदा यांच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्याजवळील बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपास सुरू आहे.
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने ‘इंडियन एक्सप्रेस’ला पतीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात जात असल्याचं तिने सांगितलं.