LPG Price Change: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका ! LPG सिलेंडर महागला; किती रुपयांनी वाढले दर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ सप्टेंबर ।। LPG Price News: आज सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस. महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्यांना महागाईचा शॉक बसला आहे. देशात आजपासून गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले आहेत. तेल वितरण कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३९ रुपयांनी वाढवल्या आहेत. नवीन दर रविवार म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1,691.50 रुपये झाली आहे.

LPG Price Change: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला; किती रुपयांनी वाढले दर? वाचा…
Maharashtra Politics : वाचाळवीरांमुळे CM एकनाथ शिंदे अडचणीत; वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करणार का?

ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे, पण घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1,691.50 रुपये झाली आहे. सध्या राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 803 रुपये आहे, तर कोलकातामध्ये 14 किलोचा सिलेंडर 829 रुपयांना विकला जात आहे. मुंबईत एलपीजीची किंमत 802.5 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडर 918.5 रुपयांना विकला जात आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 39 रुपयांनी वाढ झाल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,691.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1802.5 रुपये झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर मुंबईत 1644 रुपये आणि चेन्नईमध्ये 1855 रुपयांना मिळणार आहे. पाटण्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1947 रुपये आहे, तर जयपूरमध्ये 19 किलोचा सिलेंडर 1719 रुपयांना विकला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *