महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ सप्टेंबर ।। Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आज रविवारी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच्या दिवशी ग्राहकांना मौल्यवान धातूंनी मोठा दिलासा दिला. आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,८७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,१६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८५,०८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८४,८८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,७४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)