![]()
महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी आणि रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. आज सोमवारी पेट्रोलमध्ये कोणताही बदल केला नाही. तर डिझेलच्या दरात वाढ केली. चालू महिन्यात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ७ जुलैपासून डिझेल १.११ रुपयांनी वाढले आहे. तर जवळपास २१ दिवस पेट्रोलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी २९ जून रोजी पेट्रोलमध्ये ५ पैशांची किरकोळ वाढ झाली होती.
इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार सोमवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये कायम असून डिझेलचा भाव ७९.८३ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ऐतिहासिक स्तरावर आहे. डिझेलचा भाव ८१.६४ रुपये असून पेट्रोल ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये असून डिझेल ७६.७७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ८३.६३ रुपये असून डिझेल दर ७८.६० रुपयांवर कायम आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले.
