पहिली ते आठवीच्या विद्यार्थांना आजपासून घरच्या घरीच मिळणार शिक्षणाचे धडे ;शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही कोणतेही क्षेत्र पुर्णपणे चालू केली नाहीत. मुलांच्या शाळाही अजून बंद आहेत. त्यामुळे किती दिवस असं चालणार कारण परीक्षा रद्द करून सर्वांना पुढील वर्गाच प्रवेश दिला. पण आता चालू वर्ग कधी भरणार याची प्रतीक्षा पालकांनाही लागली आणि विद्यार्थ्यांनाही. या दरम्यान अखेर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक मोठा मिर्णय घेतला आहे.

पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनीवरून 20 जुलै पासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जाणार आहे आणियत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या मालिकेचा लाभ घ्यावा, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

दररोज प्रत्येक इयत्तेच्या एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे 60 पाठ 60 दिवसात 60 एपिसोडमध्यो सादर केले जाणार आहेत. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार अशे दहा आठवडे हा उपक्रम चालणार आहे. या मालिकेचे नाव टिलीमिली असणार आहे.
ज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) या संस्थेच्या सहकार्यातून आणि ‘एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शैक्षणिक मालिका सुरू केली जात आहे.

दरम्यान, प्रत्येक इयत्तेला एक तास मिळणार आहे. सकळी 7:30 पासून ही शाळा भरणार आहे. सर्वात पहिला आठवीचा तास भरणार आहे. त्यानंतर तासातासाने ,सातवी, सहावी, पाचवी, चौथी, तिसरी, दुसरी आणि पहिलीचा तास भरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *