मोबाईल वापरकर्त्यांनो सावधान ! १ सप्टेंबरपासून बदलले Google, TRAI आणि आधारचे नियम; वाचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। गुगल, आधार कार्ड आणि TRAI चे नियम बदलत आहेत. 1 सप्टेंबरपासून मोबाइल वापरकर्त्यांसाठी ऑनलाइन कामासाठी अनेक नियम बदलण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम गुगल आणि आधार, मोबाइल वापरकर्त्यांवर होणार आहे, तसेच याचा परिणाम टेलिकॉम कंपन्यांवरही होणार आहे. अशावेळी तुम्हाला या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं काम वेळेत पूर्ण करू शकाल. त्याचबरोबर UIDAI ची मोफत सेवाही १४ सप्टेंबरपासून बंद करण्यात येत आहे.

14 सप्टेंबरपर्यंत करा मोफत आधार अपडेट
UIDAI ने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. याचा फायदा मोबाईल वापरकर्ते घरी बसून 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करू शकतील यासाठी त्यांना ‘मोफत आधार अपडेट’ची सुविधा My Aadhaar पोर्टलवरून उपलब्ध होणार आहे.

याशिवाय, ग्राहक आधार केंद्रावर जाऊन देखील कार्ड अपडेट करू शकतात, ज्यासाठी 50 ते 100 रुपये आकारले जातात. मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी 50 रुपये तर आधार कार्ड फोटो आणि फिंगर प्रिंट अपडेट साठी 100 रुपये आकरले जातील. तसेच स्मार्ट आधार कार्ड साठी 100 रुपये जास्तीचे आकरले जातील.

Play Store धोरणात बदल
गुगलचे नवीन प्ले स्टोअर धोरण 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहे. गुगलने हजारो ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले ज्याना प्ले स्टोअरवर कमी रेटिंग मिळाले आहेत. हे ॲप्स मालवेअरचे स्रोत असू शकतात, अशी संशयास्पद माहिती गुगलला मिळाली त्यामुळे गुगलने क्वालिटी कंट्रोलच्या वतीने एक नवीन नियम लागू केला आहे. या नियमामुळे जगभरातील अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो आणि Google च्या गोपनीयतेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

OTP आणि Message मिळण्यास विलंब
ट्रायच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले ते नियम 1 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. या ट्रायच्या नवीन नियमांनुसार 1 सप्टेंबरपासून फेक कॉल्स आणि मेसेजपासून वापरकर्ते मुक्त होणार आहेत. TRAI ने 1 सप्टेंबरपासून नोंदणी नसलेले मेसेज आणि कॉल ब्लॉक करण्याचे निर्देश टेलिकॉम कंपन्यांना (VI,JIO,BSNL,AIRTEL )दिले आहेत. यामुळे ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन खरेदी आणि ऑनलाइन वितरणामध्ये काही समस्या उद्भवू शकतात यचाच परिणाम ओटीपी आणि संदेश प्राप्त करण्यास विलंब होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *