Gold Silver Price : सोने चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या, आजचे नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। Gold Silver Price Today : गेल्या महिन्यात सोने चांदीच्या दरात अस्थितरता दिसून आली. ऑगस्ट महिन्यात सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून आले. रविवारी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मात्र सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आणि ग्राहकांना दिलासा मिळाला. आज पोळ्याच्या दिवशी सोने चांदीच्या दर कसे आहेत, हे जाणून घेऊ या.

सोने चांदीचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६५८८१ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७१,८७० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८५१ रुपये आहे म्हणजेच चांदी ८५,०९० रुपये किलोनी विकली जात आहे.

रविवारी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण दिसून आली. १ सप्टेंबर २०२४ चा सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी ७१,८७० रुपये होता आणि चांदीचा दर ८५,०८० रुपये प्रति किलो होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की आज सोन्याच्या दरात चढ उतार झालेली नसून चांदी फक्त दहा रुपयांने वाढली आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,७४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *