महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। जर तुम्ही सध्या मारुती सुझुकीची नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमती कमी केल्या आहेत. कंपनीने Alto K10 आणि S-Presso पेट्रोलच्या किमती कमी केल्या आहेत.
सोमवारपासून (2 सप्टेंबर), S-Presso LXI ची किंमत 2,000 रुपयांनी आणि Alto10 VXI ची किंमत 6,500 रुपयांनी कमी झाली आहे. मारुतीने या दोन्ही कार्सच्या किमती का कमी केल्या आहेत, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
मारुती सुझुकीला गेल्या महिन्यात (ऑगस्ट 2024) विक्रीत मोठी घसरण झाली. गेल्या महिन्यात (ऑगस्ट 2024) मारुतीने 181,782 युनिट्सची विक्री केली होती. तर मागील वर्षी याच कालावधीत मारुतीने 189,082 युनिट्सची विक्री केली होती. त्यामुळे यावेळी मारुतीच्या विक्रीत 3.9 टक्क्यांची घट झाली आहे.
Maruti ALto K10 ची किंमत आणि फीचर्स
मारुती सुझुकी अल्टो K10 ही लहान कुटुंबासाठी बेस्ट कार आहे. या कारमध्ये पॉवरफुल 1.0L पेट्रोल इंजिन आहे. ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 33.85 किमी/किलो मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. ही एक फे सतार कार आहे. सुरक्षिततेसाठी कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्ज आहेत. ALto K10C VXI CNG ची एक्स-शो रूम किंमत दिल्लीमध्ये 5.96 लाख रुपयांपासून सुरू होते.
Maruti S-Presso किंमत आणि फीचर्स
मारुती सुझुकी S-Presso ही चांगली कार आहे. ज्याची किंमत 5.91 लाख रुपये आहे. या कारमध्ये 4 लोक व्यवस्थित बसू शकतात. या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे. ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 32.73km/kg चे मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह ईबीडी आणि एअरबॅग्जची सुविधा आहे.