महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। पाकिस्तान संघातील प्रमुख फलंदाज बाबर आझम फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसतोय. विराट कोहलीशी तुलना केली जाणारा बाबर आझमला आपल्याच मायदेशात धावा करताना घाम फुटतोय.
बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत तर तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानी फॅन्सने त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. दरम्यान बाबर आझमने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा संघ आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा संघ ९ व्या स्थानी आहे. बांगलादेशचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानचा संघ पराभवाच्या वाटेवर आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स संतप्त प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
बाबर आझम पूर्णपणे फ्लॉप
बाबर आझम (Babar Azam) हा पाकिस्तान संघातील प्रमुख फलंदाज आहे. मात्र बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. या मालिकेत त्याला अवघ्या ६४ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान ३१ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
Bye bye test cricket👋 pic.twitter.com/5v5kDKgqs6
— Babar Azam – Parody (@babarazam228) September 2, 2024
बाबर आझमने घेतली निवृत्ती?
सोशल मीडियावर बाबर आझमला जोरदार ट्रोल केलं जात आहे. बाबर आझम पॅरोडी अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यावर,’ मी निवृत्ती जाहीर करतोय. जेव्हा मी कर्णधार होतो, तेव्हा मी क्यूरेटरला बॅटींग फ्रेंडली पिच बनवायला सांगायचो. त्यामुळे मला धावा करणं सोपं जायचं.