महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज एसटी कर्मचाऱ्यांकडून बंद पाळण्यात येत आहे. मुंबई, पुणे, अकोला, सातारा या जिल्ह्यातील कर्मचारीदेखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळं अनेक आगारात एसटी डेपोतच उभ्या आहेत. ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत या जाणून घेऊयात.
एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हाला वेतन द्यावं, अशा प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
* 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी तसंच, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ मिळावी.
* ५८ महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी व ५७ महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी
खासगीकरण बंद करावे, सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा. इनडोअर व आऊटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू कराव्यात.
* सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा.
* विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये वर्षभराचा मोफत पास द्या
* चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचा-यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या