How To Identify Pure Ghee : आरोग्याशी खेळ; तुपातील भेसळ कशी ओळखाल?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।। तुम्ही चवीचवीनं मिठाई खात असाल तर आजारी पडाल. कारण, तुम्ही खात असलेली मिठाई भेसळयुक्त असू शकते. सणासुदीचे दिवस सुरू आहेत. बाजारात गोडधोडाचे पदार्थ विक्रीला आले आहेत. मात्र, पैसे कमावण्याच्या नादात तुमच्या आरोग्याशी खेळ केला जातोय. मावा, तूप, मिठाईत सर्रास भेसळ केली जातेय.

मावा, तूपात अशी भेसळ होते?

माव्यात निकृष्ट दर्जाची दुधाची पावडर मिसळली जाते.

टॅल्कम पावडर, चुना, खडू, पांढरे रसायनाची भेसळ होते.

नकली मावा बनवण्यासाठी दुधात युरिया, डिटर्जंट पावडर मिसळतात.

निकृष्ट दर्जाचे तूप, शुद्ध तेल, पाणी आणि शुद्ध दूध एकत्र मिसळतात.

बनावट तुपातील साधं वनस्पती तेल, पाम तेल वापरलं जातं.

तूप आकर्षक बनवण्यासाठी कृत्रिम रंग आणि सुगंध टाकला जातो.

अशा प्रकारे बनावट मावा, तूप तयार केला जातो. बनावट मावा बनवण्यासाठी निष्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे ते कमी किंमतीत बनलं जातं. मात्र, निष्कृष्ट दर्जाचं साहित्य वापरून आरोग्याशी खेळ केला जातो. त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.

 

भेसळयुक्त मिठाई खाण्याचे दुष्परिणाम

नकली तूप खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

लिव्हर खराब होणे, अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास होतो.

महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका वाढतो.

कॅन्सरसारखा गंभीर आजारही होऊ शकतो.

तुपातली भेसळ कशी ओळखायची?

तुपात भेसळ झालीय का हे तुम्ही घरीही ओळखू शकता.

एक चमचा तूप घेऊन ते एका काचेच्या ग्लासमध्ये ओतावे.

तुपात आयोडीनचे एक किंवा दोन थेंब टाका.

तुपात भेसळ असल्यास रंग लगेच बदलतो.

त्यामुळे तुम्ही मावा, तूप बाहेरून आणत असाल तर अशा पद्धतीने तपासून घ्या. सणासुदीचे दिवस सुरू आहेत. तुम्ही मिठाई घरी आणत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण, पैसे कमावण्याच्या नादात तुमच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *