Government Job : पुणे महापालिकेत नोकरीची संधी ; येथे करा अर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।। सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. मात्र काहींचे उच्च शिक्षण नसल्यामुळे अनेकांचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अपुरे राहते. अशाच काही तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेत (Pune Municipality) तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महापालिकेत ६८२ जागांसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना सहा महिने विविध विभागांत काम करण्याची संधी मिळणार आहे.

कोणत्या पदांची भरती?
पुणे महापालिकेचच्या बरतीमध्ये मॅकेनिक, सुतार, पेंटर, शीट मेटल वर्क, मशिन टूल दुरुस्ती, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ट्रॅफिक वॉर्डन, उद्यान विभागात माळी, हॉर्टीकल्चर मिस्त्री, क्षेत्रीय कार्यालयाकडील स्वच्छता विषयक कामे, अनुरेखक, आरेखक, लेखनिक, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आणि पर्यावरण विभाग यांचा समावेश आहे.

कसा करावा अर्ज?
इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करु शकणार आहेत. तसेच १५ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून त्याआधीच उमेदवारांनी अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

किती वेतन मिळणार?
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शिष्यवृत्ती स्वरूपात वेतन दिले जाणार आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ६ हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका धारकांना ८ हजार रुपये, तर पदवीधर अथवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये दरमहा वेतन मिळेल.

वयोमर्यादा
किमान १८ ते कमाल ३५ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *